Made in India
Started this discussion. Last reply by 30y69tvjsgjw2 Nov 21, 2014. 4 Replies 1 Like
जागत्या जीवाश्माबद्दल (लिव्हींग फोसिल्स) वाचतांना जिंकगोबद्दलचा उल्लेख येणे अपेक्षित होतेच पण ह्या झाडाबद्दलची इतर माहिती खूपच रोचक वाटली. हे झाड २७ कोटी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असावे असे…Continue
Started Nov 17, 2013 0 Replies 0 Likes
इसापच्या (Aesop = यीसॉप, http://en.wikipedia.org/wiki/Aesop) नीतीकथा (अर्थात भारतीय पंचतंत्रकथा) अनेकांनी वाचल्या…Continue
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:19pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:18pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on September 12, 2023 at 10:31am 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 31, 2021 at 10:01am 0 Comments 1 Like
Posted by Jasmine Singh on July 15, 2021 at 6:25pm 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 6, 2021 at 12:15pm 1 Comment 2 Likes
Posted by Pooja Yadav shawak on June 25, 2021 at 10:04pm 0 Comments 3 Likes
Posted by Pooja Yadav shawak on March 24, 2021 at 1:54pm 1 Comment 1 Like
वो जो हँसते हुए दिखते है न लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
पराये अहसासों को लफ़्ज देतें है
खुद के दर्द पर खामोश रहते है
जो पोछतें दूसरे के आँसू अक्सर
खुद अँधेरे में तकिये को भिगोते है
वो जो हँसते हुए दिखते है लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
© 2024 Created by Facestorys.com Admin. Powered by
Badges | Report an Issue | Privacy Policy | Terms of Service
Comment Wall (4 comments)
You need to be a member of Facestorys.com to add comments!
Join Facestorys.com
Welcome to Syahee...
भारतात कायद्यानुसार दोनच प्रकारचे विवाह / विवाहासमानसंबंध करता येतात (माझ्या माहितीप्रमाणे) - मंगलाष्टकेवाला आणि चंगळचइष्टवाला (लिव्हइन).
हा अन्याय आहे. माणसे, काळ, जाणीवा, गरजा, स्टेटस, विचार बदलत चालले आहेत आणि त्यास अनुरूप असा विवाहआवृत्ती असावी असे वाटते. म्हणजे काय ते खाली दिले आहे.
असे विवाहप्रकार कायदेशीररीत्या उपलब्ध करून त्याच्या आयेसोसारखे तपशील करून प्रमाणीत आवृत्त्या करणे गरजेचे झाले आहे. अर्थात असे विवाह नंतर हव्या त्या सुधारीत आवृत्तीला जोडप्यांच्या सोयीनुसार नेता आले पाहिजे. त्यासाठी कोर्टात न जाता स्वतंत्र असे लेखापरीक्षण करून लग्नाला त्यात्यानुसार मूल्यांकन करून घेता आले पाहिजे.
असे काही पर्याय नसल्यामुळे लग्नानंतर एकंदरीतच जो अपेक्षा आणि अपेक्षाभंगांचा जो खेळ सुरू होतो त्यात कोणत्या अपेक्षा कोणाकडून आणि का ठेवाव्या तेच कळेनासे होते. आंतरजातीय / धर्मीय / प्रांतीय लग्नात तर हे लई महत्वाचे असते. "आमच्याकडे अशी प्रथा आहे" असे ते सुरू होते. त्यामुळे अशी एक स्वतंत्र व्यवस्था असणे अपेक्षीत आहे की, ज्याव्दारे हे अपेक्षांचे मॉडेल तयार करून ते विवाहाच्या ज्या आवृत्तीत बसत आहे त्यानुसार कायदेशीर विवाह झाला पाहिजे.
जी आवृत्ती निवडली जाईल त्यानुसार एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे कायदेशीर होणे गरजेचे आहे. अथवा नक्की कोण पळवाट काढत आहे ते आज भावनिक दृष्टीने पाहिले जाते व भावनेवर बेतलेल्या निर्णयात अनेकदा अन्याय होतो. म्हणूनच हे विचार मनात आले व मांडले.
आजकालची मुले हे करतात की नाही माहीत नाही -
१. फटाके वाजवुन झाल्यावर, फुसके फटाके शोधणे. त्यांना दुसर्या फटाक्याच्या वाती लावणे व उडवणे
२. फुसक्या हिरव्या एटमबॉम्बची दारू काढून ती पेटवणे
३. फुलबाजीची तार वाकडी करून ती पेटवुन झाडावर फेकणे
४. फटाक्यांच्या कागदांची शेकोटी पेटवुन त्यात टिकल्यांची डबी टाकणे
५. डब्यामध्ये एटमबॉम्ब लावणे
६. उदबत्ती वातीला लावुन टाईमबोंब लावणे
७. टिकल्या अर्ध्या फाडुन त्या परत डबीत ठेवून त्यावर छोटे दगड ठेवून झाकण लावुन दोरीने बांधून आपटबार करणे.
१९७६ -७७ चा काळ असावा. नांदेडच्या वजीराबाद भागातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या ग्राऊंडावर तडाखेबंद फलंदाजी पहाण्याची संधी मिळणे ही रोजची मेजवानी असे.
त्या मुलाचे नाव मी आता विसरलो. पण आजही त्याचा खेळ स्मरणात आहे. काही सन्माननीय अपवाद सोडता, त्याच्यासारखे पदलालित्य, लीलया कोणताही चेंडू सीमेपार फटकावणे, उंचावरून फटके मारणे हे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असलेल्या अनेक खेळाडूंपेक्षा चांगले होते. त्याची फलंदाजी बघत राहणे अत्यंत सुखावह असे.
तो आमच्या संघाविरुद्धच्या संघात असायचा त्यामुळे त्याला बाद करणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान असे पण तो बाद होउच नये असे वाटे.
त्याला योग्य ते प्रशिक्षण मिळाले असते किंवा तो पुण्या-मुंबईत असता तर फार उच्चदर्जाचा फलंदाज झाला असता हे मी हजारदा सांगेन.
असे अनेकजण ज्यांच्याकडे उच्चदर्जाची Kinesthetic गुणवत्ता असते ते योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडतात. सुयोग्य वातावरण असल्याशिवाय अंकुर फुटत नाही व त्याचे वृक्षात रूपांतर होऊ शकत नाही. वृक्षात रूपांतर होतानाही ते सुंदर सुवासिक फुलांचा / मधुर फळांचा वृक्ष होणे हे ही त्या वातावरणाचाच परीपाक असु शकतो. सचिनच्या अवतीभोवती असे सुसज्ज वातावरण होते व त्याचा त्यास फायदा झालाच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, एका कुटूंबसंस्थेचे महत्व अधोरेखीत झाले.
त्यामुळेच मला त्या वरील मुलाबद्दल खुप खंत वाटते. तो मुलगा एक प्रातिनिधीक उदाहरण आहे अशांसाठी जे खुप गुणवान असतात पण सुयोग्य वातावरणात नसतात.