Made in India
इसापच्या (Aesop = यीसॉप, http://en.wikipedia.org/wiki/Aesop) नीतीकथा (अर्थात भारतीय पंचतंत्रकथा) अनेकांनी वाचल्या असतील.
ह्यातील जो गोष्टींचा प्रकार आहे, त्यास फेबल म्हणले गेले आहे. (मुळ लातिन शब्द. The word "fable" comes from the Latin "fabula" (a "story"), itself derived from "fari" ("to speak") with the -ula suffix that signifies "little": hence, a "little story".संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Fable)
फेबलमधील पात्रे म्हणजे प्राणी, नैसर्गिक शक्त्या, जी मानवाप्रमाणे व्यवहार करतात. आपल्या मातीतली फेबलं म्हणजे पंचतंत्र (इसपु- विष्णु शर्मा), जातककथा (बौद्धकाळ), विक्रम आणि वेताळ ! गंमत अशी आहे की, जगभरात अगदी मागील शतकाच्या सहाव्या दशकापर्यंत फेबलं लिहीली जात होती. भारतात मात्र विक्रम आणि वेताळ नंतर ह्याविषयाला कोणी हात घातला होता की नाही माहीत नाही. अचानक ह्या गोष्टीप्रकाराला जे वेसण लागलं आहे ते आश्चर्यकारक वाटते; जणू काही सगळ्या नीतीकथा सांगुन झाल्यात ! फेबलांमुळे पुर्वी लोकशिक्षण होत असावे. ते आता आवश्यक नाही का?
आधुनिक जगासाठी नीतीकथा लिहीण्याचा एक सुंदर प्रयत्न मध्यंतरी वाचनात आला होता. (औद्योगीक इसापनीती- अरुण मनोहर http://www.misalpav.com/node/2330). यीसॉपची काही फेबलं कालबाह्य झालीत की काय असे वाटते. उदा- गरुड आणि घुबड (ज्यात घुबड स्वत:बद्दल खोटी माहिती देतं, वगैरे). सध्याच्या काळात फेसबुकात दिलेल्या स्वत:बद्दलच्या माहितीमुळे, किंवा "फिशींग" मेलीला दिलेल्या खऱ्या उत्तराने काय झोल होतो ते आपल्याला माहीत आहे. यीसॉपची फेबलांतीलच एक नीतीकथा, ज्यात एक खोटं बोलुन जीव वाचवणारा व खरे बोलुन जीव घालवणारा, फिशींगच्या उदाहरणांसाठी फीट्ट बसतात, नाही का?
असो, ह्या नीतीकथा वाचुन बरा वेळ जायचा; यीसॉपच्या फेबलांमुळे मराठीत अनेक म्हणी आल्या. उदा- कोल्ह्याला द्राक्षे आंबट. पण तो निळा कोल्हा आणि त्याचा लाकडाच्या ओंडक्यात अडकलेला पाय पाहुन त्या गोष्टीच्या भयानक "तात्पर्या" पेक्षा त्या पाय अडकलेल्या कोल्ह्याच्या वेदना जास्त जाणवत.
~अजय भागवत
Tags:
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:19pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:18pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on September 12, 2023 at 10:31am 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 31, 2021 at 10:01am 0 Comments 1 Like
Posted by Jasmine Singh on July 15, 2021 at 6:25pm 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 6, 2021 at 12:15pm 1 Comment 2 Likes
Posted by Pooja Yadav shawak on June 25, 2021 at 10:04pm 0 Comments 3 Likes
Posted by Pooja Yadav shawak on March 24, 2021 at 1:54pm 1 Comment 1 Like
वो जो हँसते हुए दिखते है न लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
पराये अहसासों को लफ़्ज देतें है
खुद के दर्द पर खामोश रहते है
जो पोछतें दूसरे के आँसू अक्सर
खुद अँधेरे में तकिये को भिगोते है
वो जो हँसते हुए दिखते है लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
© 2024 Created by Facestorys.com Admin. Powered by
Badges | Report an Issue | Privacy Policy | Terms of Service