"तुम्हाला लाज नाही वाटत का माझी? मी दिसायला चांगली नाही म्हणून?..." आज तिच्या या प्रश्नाने खरंच मनात विचारांचे वादळ उठले... उत्तर तिला काय द्यावं म्हणून मन ही सुन्न झाले... कारण तिचे हे शब्द काळजावर आघात करून गेले... मागचा पुढचा विचार न करता मी पटकन बोलून गेलो, " तुला वाटतं ना तू चांगली दिसत नाही, जन्मतःच तुला जे रूप लाभले आहे, तेच मला आवडते, कदाचित तुझ्यासाठी किंवा या समाजाला जे आवडणारे नसेल या आवडत नसेल...! अन् तुला का वाटते की तु सुंदर नाहीस, मला का लाज वाटेल तुझी?.... मला तर तू सुंदर दिसतेस....!"
"मी सहजच म्हणाले हो तुम्हाला... मनात प्रश्न आला विचारून मोकळे झाले... तसं तर माझा भाऊ कधीही मला सोबत नेत नाही... त्याच्या मित्र मैत्रिणींशी ओळख करून देत नाही... त्याला मी त्याची बहिण आहे हे सांगायला आवडत नाही..." ती बोलून गेली... हे बोलताना तिच्या मनावर किती आघात होत असतील याची कल्पना सहजासहजी करता येत नाही...!
तिचा प्रत्येक शब्द आज मनाला जणू छळून जात होता... अंगावर सरर्कन काटा उभा राहावा अशी मनस्थिती झाली... मनात एक विचार आला, जन्मतःच शारीरिक व्यंग असलेल्यांना समाजाकडून योग्य वागणुक मिळायला नको का?... त्यांचं ही आयुष्य आहे, तुमच्या आमच्या सारखे... मग त्यांना ही आपलेपणा मिळायला हवा ना... समाजाकडून या कुटुंबाकडून दुय्यम वागणुक का दिली जाते?... काही ठिकाणी अपवाद आहेत, हे नाकारता येत नाही... समाजात अशीही काही माणसं आहेत की ते अशा व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात या त्यांना वेळोवेळी आधार देतात... पण ज्यांच्या वाट्याला अशी माणसं येत नाही, त्यांचे काय? आधीच त्यांच्या वाट्याला वेदनेचे एक डोंगर असते अन् आणखी त्यांचे मनोध्यैय खच्ची करण्याचे काम या समाजाने का करावे?...!
ज्याला आपल्या घरातले ग्लासभर पाणी आपण देऊ शकत नाही, त्याच्या विहिरीतून बादलीभर पाणी काढण्याचा आपल्याला हक्क आहे का?... ज्याच्याशी आपल्याला चार शब्द बोलायला लाज वाटत असेल या आपल्या मित्र मैत्रिणींशी ओळख करून देण्यात कमीपणा वाटत असेल, त्याने स्वतःला माणूस म्हणून घ्यायला लाज का नाही वाटून घ्यायला हवी... एखाद्या निष्पाप जीवाची अवहेलना करणारा मनाने किती कमी असेल, याचा त्याने विचार करायला हवा... ते तर शरीराच्या एका भागाने कमी असतील, पण आपण मनाने किती कमी आहोत याचा विचार करून खरं व्यंग कुणात आहे हेच आता या समाजाला कळायला हवं...!
तिच्यात सौंदर्याचा अभाव आहे, तिचा चेहरा सुंदर नाही... म्हणून तिला कमी ठरवणे या कमीपणा देऊन अवहेलना करणे... म्हणजे निव्वळ मुर्खपणा... आपल्या समाजात बुरसटलेल्या विचारांना थारा देणे, हा कुठला शहाणपणा आहे... या समाजाचे विचार कधी प्रगल्भ होतील, हा प्रश्न ही मनासमोर उभा राहतो... तीला ही मन आहे, भावना आहेत, स्वप्न, आकांक्षा अन् अपेक्षा आहेत, त्यांना खच्ची करण्याचा अधिकार आपल्याला, तुम्हा आम्हाला आहे का?.... त्यांना आपण हसवू शकत नाही या सुखाचे क्षण देऊ शकत नाही, त्यांना रडवायचा या दुःख देण्याचा कुठला अधिकार अन् तो कुणी बहाल केला आहे का? याचे उत्तर खरंतर प्रत्येकाने शोधायला हवं... एक पाऊल उचलून "आयुष्य खूप सुंदर आहे, ते तू सुंदरतेने जगून पहा...!" येव्हढे सांगणे उचित ठरणार नाही का?... जाणीव ही व्हायला हवी अन् बदल ही घडवायला हवा ना...!
ती शिक्षण घेते... काॅलेज करते... अन् शिकता शिकता जाॅब ही करते... तरी तीला कमी लेखणे ही चुक नाही का?... शरीराने परिपूर्ण असणारी एखादी तरुणी जेव्हढे करू शकते तर तेव्हढे तीही करू शकते... मग तीला कमी लेखावे, हे योग्य आहे का?... ती आपली बहिण, ती आपली मैत्रीण या ती आपली पत्नी असं सांगणे या तिची ओळख करून देणे यात कुठे आलाय कमीपणा... तीचे वास्तव अन् वास्तव्य नाकारणे यात कुठला शहाणपणा... तीला 'नव्याने पुन्हा जगून पहा, खरंच जगावंसे वाटेल'... असं पाठबळ दिले तर किती उचित आहे, हे समजायला हवे...!
शेवटी हे पान संपवता संपवता तूला काही सांगून जावंसे वाटतं, फक्त शरीराच्या एका कमतरतेने तू उदास होऊन स्वतःला दोष देऊ नको... तुझ्या कर्तृत्वात तुझ्या कलागुणांचे, मेहनतीची दर्शन घडू दे... सौंदर्याने करूप दिसते म्हणून निराश न होता कर्तृत्वाने सौंदर्यवती हो, तेच आजन्म अन् अनेक वर्षे टिकून राहिल... शरीर हे नाश्वत असते, तुझं कर्तृत्व हे नेहमी शाश्वत ठेवण्याचा प्रयत्न कर... मी तुझ्या कायम सोबतच आहे, हे कधी विसरू नको...!
प्रयत्नांशी हो या जगाची आवड...!
You need to be a member of Facestorys.com to add comments!
Join Facestorys.com